Home > News Update > बोलून द्यायचं नव्हतं तर बोलावलं कशाला, ममता बॅनर्जी मोदींवर संतापल्या...

बोलून द्यायचं नव्हतं तर बोलावलं कशाला, ममता बॅनर्जी मोदींवर संतापल्या...

बोलून द्यायचं नव्हतं तर बोलावलं कशाला, ममता बॅनर्जी मोदींवर संतापल्या...
X

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, केरळ, ओदिशा, पुद्दुच्चेरी, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश या 10 राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. यामध्ये पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी या चर्चेत मुख्यमंत्र्यांना बोलू दिलं नाही. असा आरोप लावला आहे.

मुख्यमंत्र्यांना पुतळा बनवून बसवण्यात आलं. भाजप शासित काही राज्यातील जिल्हाअधिकाऱ्यांना बोलू दिलं. आणि आपली बैठक संपवली.

जर मुख्यमंत्र्यांना बोलूच द्यायचं नव्हतं तर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक का घेतली? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मोदींनी काही जिल्हा अधिकाऱ्यांना बोलू दिलं आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान केला. असा आरोप मोदींवर केला असून

"जर राज्यांना बोलण्याची परवानगी नव्हती तर त्यांना का बोलावण्यात आलं? बोलण्यास परवानगी न देण्यात आल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी निषेध नोंदवायला हवा."

अशी मागणी देखील ममतांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ममता यांनी सांगितलं की, आम्हाला 10 कोटी लसी हव्या आहेत. आम्हाला या महिन्यात 24 लाख लसी मिळणार होत्या. मात्र, 13 लाखच मिळाल्या असा दावा देखील ममता यांनी केला आहे.

Updated : 20 May 2021 7:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top