ममता बॅनर्जी यांचा एक देश एक निवडणूक या संकल्पनेला विरोध.
देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या " एक देश" "एक निवडणूक" या संकल्पनेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला विरोध.
X
देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या " एक देश" "एक निवडणूक" या संकल्पनेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला विरोध.
"एक देश" "एक निवडणूक" या संकल्पनेला ममता बॅनर्जींचा विरोध
देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या "एक देश" "एक निवडणूक" या संकल्पनेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोध केला आहे. ही संकल्पना भारताच्या संविधानाच्या रचनेच्या विरुद्ध आहे असे सांगत त्यांनी उच्चस्तरीय समितीला पत्र लिहून आपली असहमती दर्शवली आहे. या संकल्पनेची मी सहमत नाही याचं मला दुःख होते मात्र आम्ही तुमच्या प्रस्तावाशी असहमत आहोत. या समितीमध्ये सहभागी होण्यात वैचारिक अडचणी आहेत आणि या समितीच्या संकल्पना स्पष्ट नाहीत.
"एक देश एक निवडणूक" या संकल्पनेचा मला नेमका घटनात्मक आणि संरचनात्मक अर्थ समजत नाही. जर देशाची घटना एक राष्ट्र एक सरकार या संकल्पनेची पालन करणारी असेल तर मला त्याची भीती वाटते असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. ही संकल्पना नेमकी कुठून आली या प्रश्नाचे उकल झाल्याशिवाय या शब्दांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूक घेणे अपेक्षित नाही तेथे केवळ एकाच वेळी निवडणूक घेण्यासाठी मुदतपूर्व निवडणुका घेण्यास भाग पाडले जाऊ नये असे करणे म्हणजे ज्यांनी विधानसभांसाठी पूर्ण पाच वर्षासाठी प्रतिनिधींना निवडून दिले आहे त्या मतदारांचे अधिकार काढून घेणारा असेल.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चस्तरीय समितीने सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळा घेण्याच्या विषयावर सर्व राजकीय पक्षांचे आणि लोकप्रतिनिधींचे मत मागितले आहेत. या समितीने तसे पत्रही राजकीय पक्षांना पाठवण्यात आले आहेत.याच पत्राला उत्तर म्हणून ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले आहे. या अगोदर १९५२ साली देशांमध्ये एकत्रित निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्यानंतर काही काळाने ही साखळी तुटत गेली.