#MamataBanerjee : ममता दीदींना रोखण्यात मोदी अपयशी, 200 पेक्षा जास्त जागांवर तृणमूलची आघाडी
X
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांचे कल आता हाती आले आहेत. या कलांनुसार ममता दीदींना रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयशस्वी ठरल्याचे दिसते आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने बहुमताच्या 148 जागांचा आकडा केव्हाच पार केला आहे. सध्या तृणमूल २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. यंदा एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आतापर्यंतचे कल दिसत आहेत. भाजपनेही पहिल्यांदाच प. बंगालमध्ये 100च्या पुढे जागांवर आघाडी घेतली होती. पण आता भाजप आघाडीवर असलेल्या जागा ९० च्या खा्ली आल्या आहेत. बॅनर्जी यांच्या तृणमूलने गेल्यावेळी पेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतल्याचे दिसते आहे. प. बंगालमध्ये डाव्यांच्या जागा आणखी कमी झाल्या आहेत. सध्याच्या कलांनुसार भाजपच्या प.बंगालमध्ये जागा वाढणार असल्याचे दिसते आहे.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी संपूर्ण ताकद पणाला लावूनही पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांनाच कौल दिल्याचे सुरूवातीच्या कलांवरुन दिसते आहे.