Home > News Update > कोणत्याही चर्चेशिवाय निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर ; 'ही आपल्या लोकशाहीची चेष्टा' - खरगे

कोणत्याही चर्चेशिवाय निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर ; 'ही आपल्या लोकशाहीची चेष्टा' - खरगे

कोणत्याही चर्चेशिवाय निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर ; ही आपल्या लोकशाहीची चेष्टा - खरगे
X

दिल्ली// केंद्रातील मोदी सरकारने कोणतीही चर्चा न करता निवडणूक कायदा 2021 दुरुस्ती विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक एससी पुट्टास्वामी निकालाचे उल्लंघन करणारे आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हक्कभंग होईल. कोणत्याही चर्चा किंवा छाननीशिवाय ते कसे पास केले जाऊ शकते? ही आपल्या लोकशाहीची चेष्टा आहे! असं म्हणत काँग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून मोदी सरकार जोरदार टीका केली.

मागील अनेक दिवसांपासून या विधेयकाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती, सोमवारी लोकसभेत या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत विधेयक मांडले.

Updated : 22 Dec 2021 7:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top