मालेगाव हिंसाचार: रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांची धाड, कागदपत्र जप्त
X
त्रिपुरामध्ये एका समुदायाच्या प्रार्थना स्थळावर हल्ला झाल्याची चर्चा आहे. या कथित चर्चेमुळे महाराष्ट्रात रझा अकादमीच्या संघटनेने बंद पाळला होता. या बंद दरम्यान महाराष्ट्रात अमरावतीत, नांदेड, मालेगाव या शहरात दंगली स्वरुप हिंसाचार झाला. आता या सर्व हिंसाचाराची पोलिस चौकशी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी आज मालेगावच्या रझा अकादमी संघटनेवर छापेमारी केली आहे.
मालेगावमध्ये शहरातील नवीन बसस्थानक परिसरात, जुना आग्रा रोड वर हिंसाचार झाला होता. या घटनेत सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांचे नुकसान करण्यात आले होते. या हिंसाचारात तीन अधिकाऱ्यांसह 7 पोलिस कर्मचाऱी आणि काही सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले होते. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात काही कागदपत्रांसह काही दस्तऐवज आढळून आले आहेत. दरम्यान रझा अकादमीवर नवाब मलिक यांनी दंगल घडवण्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.