मकर संक्रांतीच्या निमित्ताने पैठणीच्या पतंगाला मागणी...
X
संक्रातीला तिळगुळासोबत पंतग उडवण्य़ाची प्रथा आहे. पंतग उडवणे हा मकर संक्रातीतील एक विधी आहे. संक्रांतीच्या काळात आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसून येतात. निळेभोर आकाश पंतंगाच्या विविध रंगानी संक्रांतीच्या काळात उठून दिसते.
आता त्यामध्ये नाशिकच्या पैठणी पतंगाची सुद्धा भर पडली आहे. गेल्या १४ वर्षापासून येवला शहरात पतंग व्यवसाय करणाऱ्या शिल्पा भावसार या महिलेने येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी ही पंतगाच्या रुपाने यावर्षी मकर संक्रांतीला उपलब्ध करुन दिली आहे. आणि आता ही पैठणी आकाशात उचंच उंच भरारी घेत आहे. शिल्पा भावसार यांनी आपली कल्पनाशक्ती वापरुन जगप्रसिद्ध असलेली पैठणी साडीचा पदर वापरून विविध प्रकारचे पतंग तयार केले आहेत. त्यांना चांगली मागणी सुद्धा येवू लागली आहे.
आता पैठणीच्या साडीचा पदर पतंगावर आल्याने या पतंगाची वेगळी ओळख दिसून येत आहे. खरं तर मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. पतंग उडवल्यामुळे थंडीच्या दिवसात हातापायांना चांगला व्यायाम होतो. थंडीमध्ये कोणताही आजार होवू नये यासाठी सुद्धा पंतग उडवले जातात. पंतग उडवल्याने आपल्या शरीराला थंडीच्या काळात उर्जा मिळते. तसचं आजारपासून सुद्धा सुटका होते. काय मग संक्रांतीला पैठणी पतंग उडवणार ना...तर मग लगेच तयारीला लागा.