Home > News Update > चिंता वाढली, राज्यात २४ तासात कोरोनाचे ८ हजार ८०७ नवे रुग्ण

चिंता वाढली, राज्यात २४ तासात कोरोनाचे ८ हजार ८०७ नवे रुग्ण

चिंता वाढली, राज्यात २४ तासात कोरोनाचे ८ हजार ८०७ नवे रुग्ण
X

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणाच वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या २४ तासात तब्बल ८ हजार ८०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. पण त्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. २४ तासात २ हजार ७७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.


तर राज्यात ८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ५७८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ४४६ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ५९ हजार ३५८ एक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत झालेली ही वाढ चिंता वाढवणारी आहे. मुंबईची चिंताही वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ११६७ रुग्ण आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



तर मुंबईत महानगर प्रदेशात एकूण २०१८ रुग्ण आढळले आहेत.तर पुण्यात ७५५ रुग्ण आढळले आहेत. विदर्भात रुग्णांची संख्या वाढत असून अमरावतीमध्ये ६२७ रुग्ण आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात ८१८ तर नागपूर शहरात २३० रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण सिंधूदुर्ग जिल्ह्यात आढळले आहत. २४ तासात जिल्ह्यात केवळ ६ रुग्ण आढळले आहेत.








Updated : 24 Feb 2021 8:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top