भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 Nov 2021 6:56 AM IST
X
X
भोपाळ// भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये काल रात्री भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत चार मुलांचा मृत्यू झाला आणि एकूण 36 मुलांना वाचवण्यात यश आलं आहे. सिलिंडर फुटल्याने आग लागल्याचं सांगण्यात येत आहे.
या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर मुलांचा वॉर्ड आहे. आग लागल्यानंतर अनेक रूग्णांना स्ट्रेचरवरून बाहेर काढून तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तर, मुलांच्या कुटुंबीयांना आत प्रवेश दिला जात नाहीये. अशा स्थितीत मुलांचा शोधासाठी गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. धुराचे प्रचंड लोट असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहे. फतेहगड, बैरागढ, पुल बोगदा आणि इतर अग्निशमन केंद्रातील आठ अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे.
Updated : 9 Nov 2021 6:56 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire