रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; २००० रूपयांची नोट चलनात कायम राहणार
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 March 2024 5:22 PM IST
X
X
मुंबई - देशात २००० रुपयांच्या नोटा यापुढे चलनात कायम राहणार असल्याची स्पष्टता भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे १९ मे २०२३ रोजी २००० रूपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत २००० रूपयांच्या एकुण ९७.६२% नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत.
दिनांक १० मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या ३.५६ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. हा आकडा २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ८४७० कोटीपर्यंत घसरला आहे. २००० रुपयांच्या नोटा यापुढेही चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
Updated : 1 March 2024 5:22 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire