Home > News Update > ...तर राखी सावंतही महात्मा गांधी बनली असती: उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्षांचं वादग्रस्त विधान

...तर राखी सावंतही महात्मा गांधी बनली असती: उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्षांचं वादग्रस्त विधान

कमी कपडे घालून राखी सावंतही महात्मा गांधी बनली असती, हृद्य नारायण दीक्षित यांचं वादग्रस्त विधान

...तर राखी सावंतही महात्मा गांधी बनली असती: उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्षांचं वादग्रस्त विधान
X

सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. दीक्षित यांनी महात्मा गांधींची तुलना राखी सावंत हिच्याशी केल्यामुळे सोशल मीडियावर नेटिझन्सने त्यांच्यावर टीकेचा भाडीमार केल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय म्हटलंय हृदय नारायण दीक्षित?

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भाजप प्रबुद्ध वर्ग संमेलनामध्ये विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांची जीभ घसरली. भाषण देताना ते म्हणतात की, मी 6 हजार पुस्तकं वाचली आहे आणि त्याचे विश्लेषणही केलं आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करताना ते सांगतात की गांधी कमी कपडे घालायचे. त्यांना देश बापू बोलत असे. परंतु असं नाही की कमी कपडे घालून कुणी बौद्धिक होतं. कमी कपडे घातले किंवा उतरविल्यानं जर कुणी मोठं बनत असतं. तर आज राखी सावंत महात्मा गांधी यांच्या पेक्षाही मोठी झाली असती.

त्यांच्या या विधानाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटिझन्सने त्यांच्यावर टीकेचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर होणाऱ्या टीका लक्षात घेता दीक्षित यांनी एक ट्विट करत केलेल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतायेत की, माझ्या वक्तव्याची जी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. ती क्लिप संदर्भहीन आहे. खरंतर हा व्हिडिओ भाषणाचा फक्त एक भाग आहे.

उन्नावच्या प्रबुद्ध संमेलनात संचालकाने माझी ओळख करून देताना मला एक प्रबुद्ध लेखक म्हणून संबोधलं आहे. यामुळे मी म्हणालो की, काही पुस्तकं आणि लेख लिहून कुणीही ज्ञानी होत नाही. महात्मा गांधी कमी कपडे घालायचे. देशाने त्यांना बापू म्हटलं पण याचा अर्थ असा नाही की राखी सावंतही गांधीजी होतील. असं स्पष्टीकरण दीक्षित यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

कोण आहेत हृदय नारायण दीक्षित? Who is Hriday Narayan Dixit

हृदयनारायण दीक्षित यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या उन्नाव मध्ये झाला आहे. ते साहित्यिक, लेखक, पत्रकार आणि राजकीय नेते आहेत. भाजपचे वरिष्ठ नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. सध्या ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत.

Updated : 20 Sept 2021 1:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top