महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे च्या फोटो सह तिरंगा यात्रा
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असताना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महात्मा गांधी यांचा मारेकरी गोडसेच्या फोटोसह तिरंगा यात्रा काढण्यात आली. एकीकडे 15 ऑगस्टला शिवमोग्गा येथे सावरकरांचा फोटो लावण्यावरून कर्नाटकात गदारोळ झाला आहे. त्यातील एका व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आले होते. या ठिकाणी टिपू सुलतान यांचा फोटो फाडून सावरकरांचा फोटो लावण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे.
X
अखिल भारतीय हिंदू महासभेने सोमवारी मुझफ्फरनगरमध्ये तिरंगा यात्रा काढली, ज्यात गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा फोटो अग्रभागी लावण्यात आला होता. सोमवारी रात्री याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
हिंदू महासभेचे नेते योगेंद्र वर्मा यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं, "आम्ही स्वातंत्र्यदिनी तिरंगा यात्रा काढली होती आणि ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात चालली. त्यात सर्व प्रमुख हिंदू नेते सहभागी झाले होते. आम्ही अनेक क्रांतिकारकांचे फोटो लावले होते आणि गोडसे त्यातील एक आहे.
योगेंद्र वर्मा यांच्या मते गोडसेने स्वतःची केस स्वत: लढवली होती. न्यायालयात ते जे काही बोलले सार्वजनिक करावे. गांधींची हत्या का झाली हे लोकांना कळू नये अशी सरकारची इच्छा आहे. गांधीजींची काही धोरणे हिंदूविरोधी होती. फाळणीच्या वेळी ३० लाख हिंदू आणि मुस्लिम मारले गेले याला गांधी जबाबदार होते. गोडसेने गांधींची हत्या केली असेल, तर त्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा भोगावी लागली. "जसे काही लोक गांधींना त्यांची प्रेरणा मानतात, त्याचप्रमाणे आमच्याही गोडसेबद्दल भावना आहेत."
मुज़फ्फरनगर में हिन्दू महासभा ने गांधी जी के हत्यारे नाथूराम गोडसे की तस्वीर के साथ निकाली तिरंगा यात्रा!#IndependenceDay2022 pic.twitter.com/Diu243pjIj
— Sulliya Mohammad (@Mo_Sulliya) August 16, 2022
दरम्यान गोडसेच्या या यात्रेनंतर देशभरातील लोक या यात्रेचा निषेध व्यक्त करत आहेत.