Home > Election 2020 > वाटाघाटीबद्दल योग्यवेळी योग्य बैठका होतील - बाळासाहेब थोरात

वाटाघाटीबद्दल योग्यवेळी योग्य बैठका होतील - बाळासाहेब थोरात

वाटाघाटीबद्दल योग्यवेळी योग्य बैठका होतील - बाळासाहेब थोरात
X

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील लिलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम यांनी आज संजय राऊत यांची लिलावती रूग्णालयात भेट घेतली.

त्यामुळे या भेटीमध्ये राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. रूग्णालयातुन बाहेर आल्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना राऊत यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठीच भेट घेतली असून सत्ता वाटाघाटीबद्दल योग्यवेळी योग्य बैठका होतील असं थोरात यांनी स्पष्ट केलं.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/446410569346528/?t=0

Updated : 13 Nov 2019 4:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top