काय आहे आदित्य ठाकरे यांचे साहसी पर्यटन धोरण?
X
राज्याचे तरुण तडफदार पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी निर्णयांचा धडाका लावला असून काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (mahavikas aghadi) बैठकीत त्यांनी आता साहसी पर्यटन (adventure tourism policy) धोरणाला मंजूरी करून घेतली आहे.
या धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र व आवश्यक सर्व अहर्ता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.
साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती व विभागीय स्तरावर समित्या गठित करण्यात येतील.
या समित्यांमध्ये जमीन हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल.साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित व शिस्तबध्दरित्या आयोजित करण्यासाठीच्या सविस्तर आणि तपशीलवार सुरक्षा मार्गदर्शक सूचना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील साहसी पर्यटन धोरण सर्व प्रकारचे स्पर्धात्मक साहसी खेळ वन्यजीव अभयारण्यातील जीप सफारी व निसर्ग सहली इत्यादींच्या बाबत लागू नसेल असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
Here's announcing Maharashtra's Adventure Tourism Policy! pic.twitter.com/o8V0lbC7N1
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 14, 2021