Home > News Update > प्रदूषणमुक्त दिवाळी, फटाक्यांचा वापर कमी होतोय का?

प्रदूषणमुक्त दिवाळी, फटाक्यांचा वापर कमी होतोय का?

प्रदूषणमुक्त दिवाळी, फटाक्यांचा वापर कमी होतोय का?
X

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. कोरोना काळात मुंबईमधील ध्वनी आणि वायू प्रदूषण पातळी सुधारली होती. पण आता निर्बंध शिथिल झाल्याने दिवाळीत पुन्हा हे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीची तपासणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनने केली. यावेळी बाजारातील सामान्य फटाके आणि ग्रीन फटाके असे एकूण फटाक्यांचे 30 विविध प्रकार फोडल्यानंतर आवाजाची पातळी डीबी मीटरने तपासण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीत फक्त दोन फटाके वगळता इतर फटाक्यांची पातळी समाधानकारक आढळली आहे. उत्सवात फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केली जावी याकरीता गेल्या काही वर्षापासून व्यापक जनजागृती केली जात आहे. त्याचा दृष्य परिणाम आता दिसू लागल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरवर्षी फटाके फोडण्याच्या प्रमाणात घट दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी तपासण्यात आलेले फटाके हे बऱ्यापैकी नियमात दिसून आले आहेत. ज्या फटाके निर्मात्यांनी नियम पाळले नाहीत त्याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि आवाज फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.



Updated : 22 Oct 2021 5:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top