Home > News Update > Maharashtra MLC Election: भाजप उमेदवार प्रवीण दटके नक्की कोण आहेत?

Maharashtra MLC Election: भाजप उमेदवार प्रवीण दटके नक्की कोण आहेत?

Maharashtra MLC Election: भाजप उमेदवार प्रवीण दटके नक्की कोण आहेत?
X

आज भाजपने राज्यात 21 नोव्हेबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपने धक्का तंत्राचा वापर करत निष्ठावंतांचा पत्ता कट केला आहे. भाजपने गोपिचंद पडळकर, रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या सोबतच राज्याला फारसे परिचित नसलेल्या दोन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे.

प्रविण दटके यांच्या बाबत अधिक माहिती अशी की, ते नितिन गडकरी यांच्या जवळचे मानले जातात. 41 वर्षीय दटके हे 2014-2017 या काळात नागपूरचे महापौर होते. सध्या ते भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. दटके यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपचे नागपूर येथील महत्त्वाचे नेते होते. ते भाजपचे नागपूर अध्यक्ष होते.

पक्षाला जेव्हा कार्यकर्ते मिळत नव्हते, त्याकाळात प्रभाकरराव दटके यांनी पक्ष मजबूत केला. सहकार आणि राजकारणात पक्ष मजबूत करताना त्यांनी घरोघरी संघटन मजबूत केले. त्यांना भाजपने विधान परिषदेचे आमदार केले होते. घरातूनच पक्ष आणि राजकारण याचे बाळकडू मिळालेले प्रवीण दटके नागपूरचे महापौर होते. आजवर ते संघ व भाजपचा गड असलेल्या महाल भागातून 3 वेळा नगरसेवक झाले आहेत.

हे ही वाचा…


Maharashtra MLC Polls: निष्ठावंतांचा पत्ता कट! मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळे यांना तिकिट नाहीच…

राज्यातील ५२२८ कोरोना रुग्ण लक्षणं विरहित, राज्यात रुग्णांची संख्या 17 हजार 947

Aurangabad Train Accident: कामगारांनो घरी परतण्यासाठी जीवावर उदार होऊ नका- मुख्यमंत्री

धक्कादायक! औरंगाबादेत एसआरपीएफच्या ७२ जवानांना कोरोनाची लागण

संघ, भाजपा आणि विद्यार्थी चळवळीत दटके यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या वडिलांनी राजकारणाचा पाया मजबूत केल्याने ते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपली राजकीय मोट बांधू शकले. ते गडकरी गटाचे म्हणून ओळखले जातात. मात्र, यावेळी विधानपरिषद निवडणुकीतील अटीतटीच्या झुंजीत त्यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.

जन्म - १६ डिसेंबर १९७८ (४२ वर्षे) राष्ट्रीय उपाध्यक्ष,भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष, भाजप विद्यमान नगरसेवक व माजी नागपूर महापौर (२०१४ ते २०१७) वडील प्रभाकरराव दटके भाजप चे निष्ठावन्त कार्यकर्ते १९९५ मध्ये वडील प्रभाकरराव यांचं हृदयघातामुळे अकाली निधन २००४ साली वयाच्या २५ व्या वर्षी महाल वार्डातून नगरसेवक म्हणून निवड

Updated : 8 May 2020 3:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top