Home > Election 2020 > आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार, कुणाची कुठे होणार सभा?

आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार, कुणाची कुठे होणार सभा?

आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार, कुणाची कुठे होणार सभा?
X

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर आता चौथ्या टप्प्याच्या प्रचाराला जोरदार सुरुवात होत आहे. चौथ्या टप्प्यामध्ये मुंबईतील मतदारसंघाचा समावेश असल्याने मुंबईमध्ये हायप्रोफाईल नेत्यांच्या सभांचा धडाका आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळणार आहे.

चौथ्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी महाराष्ट्रात या मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे नेते या मतदारसंघात सभा घेत आहेत.

कुणाची कुठे होणार सभा?

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी मुलुंड इथं सभा घेणार आहेत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे काळाचौकी इथं सयुक्त सभा घेतील.

  • त्याचबरोबर मुख्यमंत्री नाशिक, कुर्ला, घाटकोपर या ठिकाणी देखील सभा घेणार आहेत.

  • राजनाथ सिंह यांची मीरा रोड इथं होणार सभा

  • ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा इथं युतीच्या उमेदवारासाठी सभा घेणार आहेत.

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण धुळ्यात सभा घेणार आहेत.

  • शरद पवार आणि छगन भुजबळ नाशिकच्या कोपरगाव इथं सभा घेणार आहेत.

  • शरद पवार यांची नाशिक गिरनारेमध्ये प्रचारसभा.

  • वंचित बहुजन आघाडीची अंबरनाथमध्ये सभा.

Updated : 24 April 2019 8:31 AM IST
Next Story
Share it
Top