राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा, रक्तदान करा : राजेश टोपे
X
जालना : कोरोना संकटाच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे, त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. त्याचबरोबर कोरोना लसीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सिरम कंपनीने केंद्राकडे परवानगी मागितली या परवानगीकडे आता डोळे लागले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.
कोरोना लसी संदर्भात 5 महत्वाच्या कंपन्या काम करत असून यापैकी 2 शासकीय असून 3 खाजगी आहेत. पुण्यातील सिरम इस्टिट्यूटचे संचालक आदर पुनावाला यांनी ट्विट करून केंद्र सरकारकडे लसीला अधिकृत करण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. आता प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट आणि कोल्डचेनची व्यवस्था करणे गरजेचं असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसंच राज्यात अत्यंत वेगाने काम सुरु असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.