Home > Max Political > तरीही आम्ही बोलायचं नाही का?: प्रविण दरेकर

तरीही आम्ही बोलायचं नाही का?: प्रविण दरेकर

तरीही आम्ही बोलायचं नाही का?: प्रविण दरेकर
X

कोरोना व्हायरस विरोधात महाराष्ट्र लढा देत असताना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष याच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अर्वाच्च भाषेत ट्रोल केलं जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

दरेकर यांनी या संदर्भात कमिश्नर ऑफ पोलिस यांना पत्र दिलं आहे. त्यानंतर आज मॅक्समहाराष्ट्राचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी प्रविण दरेकर यांच्याशी ‘टू द पॉईट’ बातचित केली, असता त्यांनी राज्यावर मोठ्या प्रमाणात संकट असताना, पोलिसांवर हल्ले होत असताना, राज्यातील रुग्ण संख्या देशात जास्त असताना, रेशन लोकांना मिळत नसताना, या बाबी सरकार समोर मांडणं हे विरोधी पक्षाचं काम आहे.

हे काम आम्ही करायचं नाही का? यावर संतप्त झालेल्या दरेकर यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना तरीही आम्ही बोलायचं नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Updated : 2 May 2020 5:22 PM IST
Next Story
Share it
Top