उद्या बारावीचा निकाल : पालक विद्यार्थ्यांची उत्कंठा वाढली..
X
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळार्फत घेतलेली परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबधीची घोषणा ट्विट करुन केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल बुधवारी ८ जून २०२२ रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासत रहावे असे मंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
महाराष्ट्र एचएससी निकाल १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणार असे अपेक्षित होते. परंतु निकाल उद्या ८ जून रोजी जाहीर केले जाणार असल्याचे बोर्डाकडून अधिकृत अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षेस १४,८५,१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,१७,१८८ मुलं असून मुलींची संख्या ६,६८,००३ एवढी आहे.
कोणत्या संकेतस्थळावर निकाल पाहणार?