Home > Election 2020 > पंतप्रधानांनी ऑफर दिली होती - शरद पवार

पंतप्रधानांनी ऑफर दिली होती - शरद पवार

पंतप्रधानांनी ऑफर दिली होती - शरद पवार
X

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यात घडलेल्या गेल्या एक महिन्यातील राजकारणाचा उहापोह केला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपकडून ऑफर होती का? या संदर्भात शरद पवार यांनी विस्तृत उत्तर दिलं.

नरेंद्र मोदी यांना मी भेटायला गेलो होतो. ही गोष्ट खरी आहे. मी त्यांना बऱ्याच दिवसाची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी मला त्या वेळेला वेळ दिली. कदाचित मोदींच्या कार्यालयाचं मत असं असावं की, आत्ता वेळ दिली की, माझ्या बद्दल गैरसमज वाढायला मदत होईल. त्यांनी वेळ दिली. मी संपुर्ण विदर्भाचा दौरा करुन आलो होतो. शेतकऱ्यांचं विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेले नुकसान याची माहिती घेतली. तेव्हा मला अशा संकटाचे काळामध्ये केंद्र सरकारने मदत करावी. हे त्यांच्या निदर्शनास आणायचं होतं.

हे ही वाचा...

मी नागपुरच्या प्रेसमध्ये सांगितलं होतं. की, केंद्र सरकारच्या नजरेला हे आणणार आहे. म्हणून मी ती वेळ मागितली होती. जी पत्र त्यांना द्यायची होती. ती दिली. वस्तुस्थिती सांगितली.

ही गोष्ट खरी आहे. की, ती बैठक संपल्याच्या नंतर विदर्भाच्या अतिवृष्टीच्या नुकसानी संदर्भात आमचं बोलणं झाल्यानंतर मी उठायला लागल्या नंतर पंतप्रधानांनी म्हटलं थांबा जरा...

आणि त्यांनी माझ्य़ासमोर प्रश्न मांडला. की, मला आपण एकत्र येऊन काम करायला मला आनंद होईल. मी त्यांना सांगितलं की, नरेंद्र भाई आपले वैयक्तिक सबंध उत्तम आहेत. ते राहतील. पण आपण एकत्र काम करणं मला शक्य नाही. त्यांनी सांगितलं, अनेक गोष्टीत तुमचं जे काम आहे, तुमची जी भूमिका असते.

विकासाच्या संदर्भात शेतीच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात, आणि आम्हा लोकांची भूमिका काय वेगळी नाही. त्यामुळं मतभिन्नता कुठं आहे. आज आपण सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी काम करावं. तुमच्यासारखे अनुभवी लोकांनी याच्यात सहभागी व्हा. माझी मनापासूनची इच्छा आहे.

मी म्हणलं की, राजकीय प्रश्न कुठं आले. त्या राजकीय प्रश्नाच्या वेळेला तुम्ही विरोधकांशी चर्चा करायला निमंत्रीत केलं. तिथं विरोधकांची विरोध करण्याची भूमिका माझ्याकडनं कधी घेतली जाणार नाही. राजकीय प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी पॉझिटीव्ह भूमिका घेतली आणि यापुढे घतल जाईल.

त्य़ामुळं त्याची काही चिंता करु नका. मात्र, तुमचा जो आग्रह आहे. आपण एकत्रित काम करावं. तो मला शक्य नाही. असं म्हणत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ऑफर नाकारली.

Updated : 2 Dec 2019 9:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top