यशोमतीताई तुम्ही आमची आण बान आणि शान: चित्रा वाघ
यशोमती ठाकूर यांच्या मागणीला चित्रा वाघ यांचा पाठींबा, काय आहे मागणी?
X
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दीड वर्ष पूर्ण झालं आहे. तरीही राज्यात अद्यापपर्यंत राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष मिळालेला नाही. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी फाईल सहा महिन्यापासून तयार असल्याची प्रतिक्रिया एका खासगी वृत्तवाहिनीला दिली होती.
त्यावर भाजप भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया देताना... यशोमती ताई तुम्ही आमची आन बान आणि शान आहात. राज्यातील महिलांचं मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करताय. महिला आयोगाला अध्यक्ष द्या म्हणून तुमच्या मागणीकडे जर सरकार लक्ष देत नसेल तर हिसकावून घ्यायची तुमची ताकत आहे.
आम्हीही सोबत आहोत कारण हा विषय तुमचा माझा नाही तर राज्यातील तमाम भगिनींचा आहे, अशी विनंती भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली आहे.
पाहा काय म्हटलंय चित्रा वाघ यांनी