Home > News Update > राज्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल

राज्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल

राज्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल
X

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिंदे -फडणवीस सरकारने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या आहे. याबाबत राज्य सरकारने काल १३ डिंसेबर रोजी पत्रक जारी करून माहिती दिली आहे. या बदल्यांमध्ये अमिताभ गुप्ता, विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या या बदल्यांनी आणि पदोन्नतीची आता जोरदार चर्चा आहे.

राज्यात हिवाळी अधिवेशनापुर्वी अखेर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या व बढतीना मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील पोलीस दलात मोठे बदल करण्यात आले आहेत.याबाबत काल राज्यशासनाने शासन निर्णय काढुन माहीती दिली .ह्यात काही अधिकाऱ्याच्या बदल्या तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे . राज्यात हिवाळी अधिवेशनापुर्वी बदल्या केल्यामुळे जोरदार चर्चा राज्यभर सुरु आहे .पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची झालेली बदली. अमिताभ गुप्ता यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बदली करण्यात आली आहे. तर रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. .मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली गेली आहे. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था ) असलेले विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. विनय कुमार चौबे यांची या पदावरून बदली झाल्याने या रिक्तपदावर नांगरे पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. ते मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था ) या पदावर होते. यासह मुंबईचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) राज वर्धन यांची अप्पर पोलीस महासंचालक (सुरक्षा मंडळ) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. निकेत कौशिक यांची अप्पर पोलीस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ) पदी बदली करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख (सीआयडी) अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पिंपरीच्या पोलिस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या शाईफेकीमुळे शिंदे यांची बदली झाल्याची चर्चा आहे.पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाचे उपमहानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची मुंबईत बदली करण्यात आली. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक प्रवीण पवार आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (मोटार परिवहन) सुनील फुलारी यांची बदली करण्यात आली.

Updated : 14 Dec 2022 3:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top