Home > News Update > महाराष्ट्र दिन: कोरोनाच्या काळात कसा साजरा केला जाणार महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन: कोरोनाच्या काळात कसा साजरा केला जाणार महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन: कोरोनाच्या काळात कसा साजरा केला जाणार महाराष्ट्र दिन
X

सध्या करोना महामारीची दुसरी लाट सुरु आहे. राज्यातली वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता यंदा महाराष्ट्र दिन साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागातर्फे जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र दिनासाठी अशा आहेत सूचना...

- जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे.

- विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरिता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये.

- इतर सर्व जिल्ह्यांत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे.

- ध्वजारोहण कार्यक्रमाला केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त, मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/ नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित रहावे.

- इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येऊ नये.

- विधीमंडळ, उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.

- ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे.

Updated : 29 April 2021 2:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top