Home > News Update > १२ ते १५ वर्षांच्या मुलांचे लसीकरण कधी? आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची माहिती

१२ ते १५ वर्षांच्या मुलांचे लसीकरण कधी? आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची माहिती

१२ ते १५ वर्षांच्या मुलांचे लसीकरण कधी? आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची माहिती
X

देशात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे १५ ते १८ वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवारपासून या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी या वयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील, अशी मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. आता 12 ते 15वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.




जालन्यामध्ये टोपे यांच्या उपस्थितीत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत राज्यांना समान निकष असायला हवे अशी मागणीही टोपे यांनी केली. मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची सरकारची इच्छा होती, पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे, त्यामुळे दवाखान्यात लसीकरण सुरू केले गेले असे टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमात गर्दी टाळावी असंही टोपे यांनी सांगितल. कोरोना वाढत असल्यानं प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केले.




केंद्र सरकारने वैद्यकीय सुविधेसाठी 23 हजार 123 कोटी रुपयेनिधी निधी राज्यांना दिला होता. 17 टक्क्यांपेक्षा जास्त निधी कोणत्याही राज्याने वापरला नाही, असे केंद्राचे म्हणणे आहे. यावर उत्तर देताना राजेश टोपे म्हणाले खर्च कसाही करून चालत नाही. त्याचे नियोजन करावं लागते. हा निधी खर्च करण्यासाठी आढावा बैठक घेणार असल्याचे देखील टोपे म्हणाले. लॉकडाऊनबाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा अशी मागणीही केंद्राकडे केली असल्याचं त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शाळेमध्ये लसीकरण करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असंही टोपे यांनी सांगितलं आहे.

Updated : 3 Jan 2022 12:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top