फडणवीसांनी एका दगडात किती पक्षी मारले?
X
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काय बदल होतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा
2014 ला भाजपाला पाठींबा देणं ही ऐतिहासिक चूक होती – जितेंद्र आव्हाड
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद
त्यातच धनंजय मुंडे Dhananjay Munde हे देखील सगळ्या घडामोडीत गायब आहेत. ते आता राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाले आहेत. मात्र, अजित पवार यांच्या सोबत धनंजय मुंडे देखील बाहेर पडले तर पंकजा मुंडे Pankaja Munde यांचं काय होणार? बीडच्या राजकारणामध्ये काय काय बदल होतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवारांना पाडू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस यांचा हा शब्द देखील खरा ठरणार का? कारण स्वत: शरद पवार यांनीच आता विडा उचललेला आहे. की जे जे लोक सोडून जातील त्यांना आम्ही सगळे जन मिळून पाडू. त्यामुळे बारामतीमध्ये पवारांचा पराभव होणं, हे सु्द्धा देवेंंद्र फडणवीस साध्य करणार का?
म्हणजेच फडणवीसांनी एका दगडात किती पक्षी मारले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.