Home > News Update > #PetrolDieselPrice : केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही दरकपात

#PetrolDieselPrice : केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही दरकपात

#PetrolDieselPrice : केंद्रापाठोपाठ राज्याकडूनही दरकपात
X

Petrol आणि Dieselच्या वाढत्या दरांमुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्यांना केंद्राने थोडा दिलासा देण्याची घोषणा शनिवारी केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारनेही रविवारी दरकपातीची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी कमी करत पेट्रोलवर लिटरमागे आठ रुपये तर डिझेलवर सहा रुपये शुल्क कमी करण्यात आले. त्यामुळे पेट्रोल ९ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाले तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्यांनीही कर कमी करण्याचे आवाहन केले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील vat कमी केला आहे.

मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारनेही २२ मेपासून म्हणजे रविवारपासून पेट्रोलवरील vat २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील vat १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. त्यामुळे सरकारवर २५०० कोटींचा भार पडणार आहे. पण यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कर कपात केल्याने पेट्रोल ११ रुपये ५८ पैसे आणि डिझेल ८ रुपये ४४ पैसे स्वस्त झाले आहे.

Updated : 22 May 2022 6:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top