Home > News Update > औरंगाबाद आणि धाराशिव शहरांपाठोपाठ दोन जिल्ह्यांची बदलली नावं

औरंगाबाद आणि धाराशिव शहरांपाठोपाठ दोन जिल्ह्यांची बदलली नावं

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली. मात्र या बैठकीतून मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला बैठकीआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद आणि धाराशिव शहरांपाठोपाठ दोन जिल्ह्यांची बदलली नावं
X

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारने हा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव हे नाव दिले. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्य सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीपुर्वीच राज्य सरकारने दोन जिल्ह्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला.

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्येही यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे दोन्ही शहरांची नावं तुर्तास कायम ठेवण्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र आता उच्च न्यायालयात हे प्रकरण असतानाच औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांप्रमाणे जिल्ह्याचे नावंही छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्यात आले आहे.


तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यापार्श्वभुमीवर सरकारने राजपत्र प्रकाशित करून दोन्ही शहरांनंतर दोन्ही जिल्ह्यांचीही नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे.


याबरोबरच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मराठवाड्यासाठी सिंचन, शेती, आरोग्य, शिक्षण, दळण वळण आणि उद्योगासाठी सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाता आहे.

Updated : 16 Sept 2023 11:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top