राज्य सरकारने अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी दिलेले १० हजार कोटी पुरेसे आहेत का?
X
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी सरकारने १० हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत.
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एन डी आर एफ च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) आपण जाहीर करत असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे.
ही मदत खालील प्रमाणे राहील…
जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर
ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
मात्र, शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली ही मदत शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहाता पुरेशी आहे का? असा सवाल उपस्थित होतो.