पुण्यातील तहसीलदार कार्यालयातून EVM मशीन चोरीला, घटना CCTV मध्ये कैद
महाराष्ट्रातील पुणे येथील तहसीलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेली आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या तीन जणांना अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Feb 2024 12:00 AM IST
X
X
महाराष्ट्रातील पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेली आहेत. एका महसूल अधिकाऱ्याच्या कार्यालयातून अज्ञात व्यक्तींनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) उपकरण आणि काही स्टेशनरी चोरल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.
सीसीटीव्ही समोर आले
या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, “ईव्हीएम मशीनचे उपकरण आणि काही कागदपत्रांची बंडल चोरीला गेली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या तिघांना पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Updated : 7 Feb 2024 12:06 AM IST
Tags: maharashtra maharashtra news jai maharashtra maharashtra politics atm machine theft in andheri electronic voting machine savdhan maharashtra latest news in marathi printing machine evm machine
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire