परळी विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी...?
Max Maharashtra | 19 Oct 2019 1:26 PM IST
X
X
विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या नजरेत असलेला परळी मतदारसंघात एकीकडे भाऊ तर दुसरीकडे ताई अशी निवडणूक रंगणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुडेंनी धनंजय मुडेंना चांगलाच टोला लगावलाय. विकास हवाय की गुंडगिरी असा सवाल परळीच्या जनतेसमोर त्यांनी केला.
त्याचप्रमाणे धनंजय मुडेंनी देखील कॅबिनेट मंत्री हवी की मदतीला धावून येणार आणि विकास करणारा हवाय. अशी टीका भावाने बहिणीवर केली. २०१४ मध्ये धनंजय मुडेंचा पंकजा मुडेंनी पराभव केला होता. मात्र आता धनंजय मुडेंना २०१४ च्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. २०१४ विधानसभेच्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच निधन झाल्यामुळे पंकजा मुडेंना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली होती. परंतु यंदाच्या विधानसभेत विकास ह्या मुद्द्यावर परळीची जनता मतदान करेल त्यामुळे पंकजा मुडेंना निवडणूक जड जाणार आहे.
परळीमध्ये मराठा समाजानंतर बंजारा समाजाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात आहे. पंकजा मुंडे यांनी मतदारसंघात दोन हजार कोटींच्या जवळपास निधी देऊन विकास कामांचा दावा केलाय. त्यात ग्रामपंचायती, मुख्यमंत्री ग्रामसडक, जलसंधारण, राष्ट्रीय महामार्गासाठी, बचतगट चळवळ आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पंकजा मुंडेंच्या काही अडचणीच्या बाजूदेखील आहेत त्यात कार्यकर्त्यांशी संपर्काची कमी मुंबईतूनच सूत्र हलवतात. असे आरोप त्यांचावर सातत्याने होतात.
Updated : 19 Oct 2019 1:26 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire