Home > Election 2020 > शिवसेनेला कॉंग्रेस पाठींबा देणार? सोनिया गांधी यांच्याबरोबर नेत्यांची बैठक सुरू...

शिवसेनेला कॉंग्रेस पाठींबा देणार? सोनिया गांधी यांच्याबरोबर नेत्यांची बैठक सुरू...

शिवसेनेला कॉंग्रेस पाठींबा देणार? सोनिया गांधी यांच्याबरोबर नेत्यांची बैठक सुरू...
X

राज्यातील राजकीय परिस्थिती वर राज्यातील कॉंग्रेसचे नेते आज कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले आहेत. सध्या त्य़ांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. या बैठकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे महाराष्ट्रातील नेते उपस्थित आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निकालानं राज्यातील राजकीय पक्षाची चांगलीच गोची झाली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेचं घोडं अजुनही गंगेत न्हालेलं नाही. त्यामुळं शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सरकार स्थापन करेल का? या चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे. त्यातच शिवसेना आमच्यासमोर इतरही पर्याय आहेत, असं म्हणत भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर आज सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Updated : 1 Nov 2019 8:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top