Home > News Update > महाराष्ट्राने केले मग देशाला का जमले नाही? रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा खडा सवाल

महाराष्ट्राने केले मग देशाला का जमले नाही? रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा खडा सवाल

आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोरोना नियंत्रणात देश अपयशी झाल्याप्रकरणी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी कोरोना परिस्थती हाताळण्यावरून महाराष्ट्र सरकारचे कौतुक करत महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकले. मात्र, इतर सरकारांना ऐवढे सुद्धा करता आले नाही, अशा शब्दात राजन यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

महाराष्ट्राने केले मग देशाला का जमले नाही? रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा खडा सवाल
X

देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचे हे संकट स्वातंत्र्यानंतरचे भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं. तसेच त्यांनी कोरोना परिस्थती हाताळण्यावरून महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. दिल्लीमध्ये शिकागो सेंटर विद्यापीठाने आयोजित केलेल्या व्हर्चूअल कार्यक्रमात ते बोलत होते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी भारताने दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याची त्वरित आवश्यकता आहे. देशात कोरोना पसरल्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक आव्हान उभे राहिले होते.

मात्र, आता हे आव्हान आर्थिक व वैयक्तिक दोन्ही पातळीवर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारतामध्ये दररोज 3 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. संसर्गामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे, असे राजन म्हणाले. कोरोना रूग्णांना महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकले. मात्र, इतर सरकारांना ऐवढे सुद्धा करता आले नाही, असे म्हणत राजन यांनी महाष्ट्राचे कौतुक केले.

महामारीनंतर समाजाकडे आपण गांभीर्याने प्रश्न विचारले नाही. तर ही महामारी इतकीच मोठी शोकांतिका ठरेल. कधीकधी आपण लपून नव्हे. तर उघडपणे सुधारणा करणे आवश्यक आहे, असेही राजन म्हणाले. सध्या रघुराम राजन शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझिनेस विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

यापूर्वी रघूराम राजन यांनी कोरोना परिस्थीती हातळण्यावरून केंद्रावर टीका केली होती. न देशात कोरोना रुग्णांचा आकडा तीन लाखांवर जात असून दुसरी लाट रोखण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे रघुराम राजन म्हणाले होते. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव याचा परिपाक म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाचे मोठं नुकसान केले, असे ते म्हणाले होते.

Updated : 16 May 2021 6:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top