मोठा दिलासा राज्यात ८२ हजार २६६ रुग्ण बरे होऊन घरी
X
आज राज्यात ८२ हजार २६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आज राज्यात ५३,६०५ नवीन रुग्णांचे निदान. झाले आहे. राज्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असले तरी अजुनही मृत्यूचे प्रमाण घटताना दिसत नाही. आज राज्यात ८६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ४३,४७,५९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८६.०३% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९१,९४,३३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५०,५३,३३६ (१७.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३७,५०,५०२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर दुसरीकडे मुंबईमध्ये २६६४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आज मुंबईत ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ६ लाख ७४ हजार ०७२ रुग्ण आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ६,२८,२१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
राज्यातील महापालिका