राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा घटला, मृत्यूचा आकडा चिंताजनक
X
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. मात्र, मृत्यूंचा आकडा 500 पेक्षा कमी होताना दिसत नाही. आज राज्यात कोरोनाच्या २६ हजार ६१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज राज्यात ५१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३% एवढा आहे.
कोरोना बाबत आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे आजही राज्यात निदान झालेल्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज राज्यात ४८ हजार २११ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ४८,७४,५८२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.१९% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,१०२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ४,४५,४९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –