राज्यात 62 हजार 919 कोरोना रुग्ण, 828 रुग्णांचा मृत्यू
X
राज्यात लॉकडाऊन लावूनही कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आज राज्यात ६२ हजार ९१९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर ८२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५% एवढा आहे. तर दुसरीकडे आज राज्यात ६९,७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३८,६८,९७६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.०६% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७१,०६,२८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,०२,४७२ (१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,९३,६८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण ६,६२,६४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –