Home > News Update > राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वांधिक लसीकरण?

राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वांधिक लसीकरण?

राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वांधिक लसीकरण?
X

राज्यात आज २८२ केंद्रांवर २१ हजार ६१० (७६ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात सर्वात जास्त बीड जिल्ह्यात १५१ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले.

आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार, बुधवारी आणि आज झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण ७४ हजार जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज ३१८ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली आहे.

आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी आणि टक्के) :

अकोला (२०५, ६८ टक्के), अमरावती (५५७, १११ टक्के), बुलढाणा (२५६, ४३ टक्के), वाशीम (२९८, ९९ टक्के), यवतमाळ (५००, ८३ टक्के), औरंगाबाद (७७२, ७७ टक्के), हिंगोली (२३४, ११७ टक्के), जालना (४३६, १०९ टक्के), परभणी (२४२, ६१ टक्के), कोल्हापूर (७६३, ६९ टक्के), रत्नागिरी (३०९, ६२ टक्के), सांगली (५४५, ६१ टक्के), सिंधुदूर्ग (१९५, ६५ टक्के), बीड (७५७, १५१ टक्के), लातूर (४३९, ७३ टक्के), नांदेड (२९६, ५९ टक्के), उस्मानाबाद (३०९, १०३ टक्के), मुंबई (१३६१, ९१ टक्के), मुंबई उपनगर (२०३०, ८५ टक्के), भंडारा (२६३, ८८ टक्के), चंद्रपूर ( ५३९, ९० टक्के), गडचिरोली (४३९, ९८ टक्के), गोंदिया (२५९, ८६ टक्के), नागपूर (१०२०, ८५ टक्के), वर्धा (६५७, ११० टक्के), अहमदनगर (८१०, ६८ टक्के), धुळे (३७०, ९३ टक्के), जळगाव (५४३, ७८ टक्के), नंदुरबार (३०४, ७६ टक्के), नाशिक (९१६, ७० टक्के), पुणे (१२७५, ४४ टक्के), सातारा (७३५, ८२ टक्के), सोलापूर (५८४, ५३ टक्के), पालघर (३४२, ८६ टक्के), ठाणे (१८०५, ७८ टक्के), रायगड (२४५, ६१ टक्के)

Updated : 23 Jan 2021 9:26 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top