शरद पवारांवर ईडीकडून गुन्हा दाखल
Max Maharashtra | 24 Sept 2019 8:19 PM IST
X
X
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी (MAHARASHTRA STATE CO BANK SCAM) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ED case) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ यांसारख्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.
सुरींदर अरोरा यांनी राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाने या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Updated : 24 Sept 2019 8:19 PM IST
Tags: ajit pawar bjp CM devendra Fadanavis Maharashtra Co Statae Bank Scam Mamata Banarjee ncp chief sharad pawar ncp sharad pawar p-chidambaram Raj Thackeray sharad pawar sharad pawar on modi assassination sharad pawar vs modi
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire