आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करा: मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
X
आज मराठा आरक्षणासह राज्यातील प्रलंबित प्रश्ना संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर या सर्व नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांशी कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली. याची माहिती या नेत्यांनी दिली.
ही बैठक प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाची मर्यादा 50 टक्यापेक्षा अधिक करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मराठा आरक्षणासह, इतर मागासवर्गीयांचं आरक्षणाच्या बाबतीत देखील बातचीत केली. तसंच मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा उपलब्ध करुन द्यावी. किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत. मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे आवश्यक असून त्यात तात्काळ बदलं करण्याच यावेत. महाराष्ट्राला चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. अशा मागण्या मोदींकडे केल्या आहेत.
पाहा काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी