Home > News Update > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस!
X

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief minister Uddhav Thackeray) यांनी मुंबईत जे जे रुग्णालयात (J J Hospital Mumbai) कोरोनाची लस घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, (Rashmi Thackeray) पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) उपस्थित होते. (Maharashtra chief minister uddhav Thackeray gets first dose of vaccine)

उद्धव ठाकरे यांनी आज भारत बायोटेकची को-वॅक्सिन (Covid-19 vaccine made by Bharat Biotech) या लसीची पहिला डोस घेतला आहे. यावेळी डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. (Dr. Tatyarao Lahane)

देशात कोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षापुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसंच ज्या लोकांना गंभीर आजार आहे. अशा 45 वर्षापुढील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोव्हीडची लस घेतली आहे.

Updated : 11 March 2021 2:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top