भाजपच्या नव्या कार्यकारिणीत कोणाचा वरचष्मा?
X
आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन वर्षासाठीची राज्याची कार्यकारीणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र, त्यांची बहिण खासदार प्रतिम मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी दिली आहे.
पंकजा मुंडे यांना राज्यकार्यकारणीत स्थान मिळालं नसलं तरी त्यांनी आपली बहिण खासदार प्रितम मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भात पंकजा यांनी आपली बहिण प्रितम मुंडे यांचं ट्विट करुन अभिनंदन केलं आहे.
"प्रितम मुंडे ताईला शुभाशीर्वाद प्रदेशाचे उपाध्यक्ष मिळाल्या बद्दल अभिनंदन... मुंडे- महाजनाच्या संघटनेतील कामाचा वारसा चोख बाजावशील असा पूर्ण विश्वास. गुड लक."
नाराज असलेले एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे. खडसे यांना स्थान देण्यात आलं नसलं तरी रक्षा खडसे यांना महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडें यांना पक्षाच्या पातळीवर केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाईल. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या विरोधात पराभूत झालेले माजी मंत्री राम शिंदे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद, तर तिकिट नाकारलेलं चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाच्या महामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महिला मोर्चाची जबाबदारी उमा खापरे यांच्यावर देण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्षामध्ये तीन महिलांना स्थान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांना कार्यकारीणीत स्थान दिलं नसलं तरी बीड मधून प्रितम मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. तर नाशिकमधून डॉ. भारती पवार यांना स्थान देण्यात आलं आहे.
महामंत्री पदावर महिलांमधून देवयांनी फरांदे यांना स्थान देण्यात आलं असून यामध्ये माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुजीतसिंह ठाकूर, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांना स्थान देण्यात आलेलं नाही.
भाजपचे मुख्य प्रवक्ते पद साभाळलेल्या माधव भंडारी यांना आता प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. तर मुख्य प्रवक्ते पद आता केशव उपाध्ये यांच्याकडे देण्यात आले आहे.
आयटी विभाग प्रमुख: आशिष कुलकर्णी
मुख्य प्रतोद - आशीष शेलार, प्रतोद माधुरी मिसाळ,
युवा मोर्चा - विक्रांत पाटील
दरम्यान भाजपच्या कार्यकारीणीवर नजर टाकल्यास भाजप च्या ज्या ज्या नेत्यांना फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अशा सर्व नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं दिसून येतं आहे.