सणासुदीच्या तोंडावर एटीएसकडून संशयित दहतवादी पकडला
सणासुदीच्या तोंडावर देशात घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पोलिस पथकाने अटक केल्यानंतर आता मुंबईतही महाराष्ट्र एटीएसनं एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर असल्याचे सांगितले जात आहे.
X
गणेशोत्सवाच्या काळात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या एका दहशतवाद्याचे मुंबई कनेक्शन उघड झाले होते. जान मोहम्मद अली शेख यांचा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली होती.दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून एकूण सहा जणांना अटक केली होती. यामध्ये जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, ओसामा उर्फ सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ साजू उर्फ लाला या सगळ्यांना अटक केली आहे. हे सगळेजण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या ठिकाणी घातपात करणार होते.
अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोघांनी पाकिस्तानला जाऊन ट्रेनिंग घेतली होती असं पोलिसांचं म्हणनं आहे.महाराष्ट्र ATSनं यावर पत्रकार परीषद घेऊन सविस्तर माहीती दिली होती. त्यानंतर धडक कारवाई करत महाराष्ट्र एटीएसनं जोगेश्वरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली आहे. झाकीरला ताब्यात घेतलं आहे.
एटीएसनं ताब्यात घेतलेल्या जाकीरचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन असल्याची माहिती आहे. तसंच, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांसोबतही झाकीरचे संबंध होते. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी जान मोहम्मदनं झाकीरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होते, अशी माहिती आहे.