Home > Election 2020 > आर्वी विधानसभा मतदारसंघातील लढत

आर्वी विधानसभा मतदारसंघातील लढत

आर्वी विधानसभा मतदारसंघातील लढत
X

वर्धा जिल्ह्यातील तीन मतदार संघापैकी सर्वात महत्वाचा मतदार संघ म्हणजे आर्वी, या मतदारसंघात १९६२ साली अपक्ष उमेदवार नारायण काळे निवडून आले होते. १९७२ मध्ये अपक्ष धैर्येशील वाघ, १९७८ मध्ये शिवचंद चुडीवाल अपक्ष, त्यानंतर १९८५,९०,९५,९९ लागोपाठ चार वेळा काँग्रेस जाहीर केलेल्या तिकिटावर शरद काळे या मतदार संघातून विजयी झाले.

त्यानंतर २००४ मध्ये त्यांच्या मुलाला (अमर काळे) उमेदवारी दिली आणि त्यांनी देखील या मतदारसंघातुन विजयश्री खेचून आणला, परंतु २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमर काळेंना पराभवास सामोरं जावं लागलं. २०१४ मध्ये २००९ च्या पराभवाचा वचपा काढत परत एकदा अमर काळे विजयी होऊन आलेत. परंतु २०१९ विधानसभेची लढाई त्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे, आर्वी मतदार संघात दादाराव केचे २०१४ च्या पराभवा नंतर सातत्याने या मतदार संघात काम करताय. त्यामुळे अमर काळेंसाठी हि लढाई कठीण जाणार आहे.

Updated : 19 Oct 2019 1:13 PM IST
Next Story
Share it
Top