...म्हणून मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते
Max Maharashtra | 15 Sept 2019 10:23 PM IST
X
X
असं म्हणतात ‘लाख मेले तरी चालतील मात्र, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. मात्र, या यात्रेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. आज मुख्यमंत्र्यांची यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. आणि या यात्रेत मोठ्या प्रमाणात झाडं, वीजेच्या तारा येत आहेत. त्यामुळे सत्तेसाठी भाजप पक्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या जीवाशी पक्ष खेळ खेळत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री भलेही भाजपचे असले तरी ते अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अखंड महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असताना त्यांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळणं चुकीचं आहे.
महाराष्ट्राने रस्ते अपघातात लोकनेते गोपिनाथ मुंडे सारखा लढवय्या नेता गमावला. त्यामुळे महाराष्ट्राचे कधीही न भरुण निघणारे नुकसान झाले. आज लोकनेते गोपिनाथ मुंडे आपल्यात नाहीत. आजही आपलं मन हे मान्य करत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे आत्तापर्य़ंत दोन ते तीन वेळा मोठे अपघात झालेले आहेत. आणि हे अपघात मुख्यमंत्र्यांच्या जीवावर बेतणारे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या जीवाला नक्षलवाद्यांपासून धोका आहे. त्यामुळे गाडीवर उभा राहुन प्रवास करणं धोक्याचं आहे.
जरी देवेंद्र फडणवीस भाजपचे आमदार अथवा नेते असले तरी ते 11 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असताना त्यांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळणं चुकीचं आहे. त्यामुळे लाख मेले तरी चालतील मात्र, लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. अखंड महाराष्ट्राची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर आहे. अशा मुख्यमंत्र्यांच्या जीवाशी खेळणारी ही यात्रा बंद करणं गरजेचं आहे. भाजपने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जीवाशी सुरु असणारा हा खेळ बंद करावा.
Updated : 15 Sept 2019 10:23 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire