Home > News Update > Video: आदिवासी तरुणाला ट्रकला बांधून बेदम मारहाण, मारहाणीत तरुणांचा मृत्यू

Video: आदिवासी तरुणाला ट्रकला बांधून बेदम मारहाण, मारहाणीत तरुणांचा मृत्यू

Video: आदिवासी तरुणाला ट्रकला बांधून बेदम मारहाण, मारहाणीत तरुणांचा मृत्यू
X

मध्य प्रदेश च्या नीमच जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरी च्या संशयावरून एका आदिवासी तरुणाला स्थानिकांनी मारलं आहे. पोलिसांनी या संदर्भात ४ जणांना अटक केली असून आणखी ४ जणांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली स्टेशनमध्ये घडली आहे. बाणदा गावातील स्थानिक कान्हा उर्फ कन्हैया भील याला चोरीच्या संशयातून पकडलं गेलं. आणि त्याला बेदम मारहाण केली. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कान्हा हात जोडून जीवाची भिक मागत होता.परंतु कुणालाही त्याची दया आली नाही. बेदम मारहाणीनंतर त्याचे हात-पाय बांधून त्याला एका लोडिंग ट्रकला बांधून फरफटत नेलं. या दरम्यान तो जखमी झाला. तसंच आरोपींनी या घटनाक्रमाचा व्हिडिओ बनून व्हायरल केला आहे.

आदिवासी तरुण जखमी असल्याची माहिती १०० नंबरला दिली. पोलिस घटनास्थळी पोहचले असता समजले की ज्यांनी फोन केला त्यांनीच कान्हाला बेदम मारहाण केली होती.

सिंगोली पोलिसांनी यासंदर्भात आठ जणांवर हत्या, एट्रोसिटी एक्ट सह अन्य कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी महेन्द्र गुर्जर सह चार जणांना अटक केली आहे. दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानं माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी मध्यप्रदेश मधील शिवराज सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मध्य प्रदेशात नेमकं काय सुरु आहे. आता नीमच जिल्ह्यातील सिंगोली मध्ये कन्हैलाल भल नावाच्या आदिवासी तरूणाची बेदम मारहाण केल्याची अमानवीय घटना समोर आली आहे. तरुणाला चोरीच्या संशयात बेदम मारहाण करून त्याला वाहनाला बांधून फरफटत नेलं. यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. असं कमलनाथ यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

कमलनाथ यांनी या संदर्भात आणखी एक ट्वीट केलं आहे. ते म्हणतात...

सतना, इंदोर, देवास आणि आता नीमच मध्ये अशी घटना समोर आली आहे. राज्यात अराजकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. लोक बिंधास्त होऊन कायदा हातात घेत आहे. कायद्याची भिती कुणाला राहिली नाही. सरकार नावाची वस्तूही कुठे दिसत नाही.

भाजपानं काय म्हटलंय

नीमचच्या घटनेसंदर्भात मध्य प्रदेश भाजप चे प्रवक्ता रजनीश अग्रवाल सांगतात, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ४ जणांना अटकही झाली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. सरकार कोणत्याही आरोपीला पाठीशी घालत नाही. ज्याने जो गुन्हा केला आहे. त्याला त्याची शिक्षा होणार.

Updated : 29 Aug 2021 11:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top