श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बंद असल्यामुळे देवस्थानला 60 कोटी रुपयांचा फटका
X
पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळे दर्शनासाठी बंद आहे. भाविकांचा ओघ सुद्धा कमी झालेला आहे. याचा परिणाम थेट देवाच्या दानपेटीवर झालेला आहे. मात्र तरीसुद्धा मंदिराला येणार विज बिल हे महिन्याला जवळपास 7 लाख रुपये इतक आहे. त्यामुळे मंदिर समितीची अवस्था बिकट झाली आहे.
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बंद असल्यामुळे 60 कोटी रुपयांचा फटका मंदिर समितीला बसलेला आहे. दरवर्षी विविध मार्गातून 35 कोटी रुपयांच्या आसपास मंदिर समितीला उत्पन्न मिळत असतात. पण सध्या वर्षभरात फक्त सहा कोटी रुपयांचे दान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला मिळालेलं आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, सात मजली संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, संत तुकाराम महाराज भवन, 272 खोल्यांचे भव्य भक्त निवास, गोशाळा अशा विविध ठिकाणचे वीज बिल हे सध्या सात लाख रुपयांचे येत आहे. मंदिर बंद असल्यापासून 71 लाख रुपयांचे विज बिल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भरले आहे
जेव्हा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनास सुरू होतं तेव्हा दर महिन्याला हेच बिल 13 लाखांच्या आसपास यायचं.पण या काळात भाविकांनी टाकलेल्या दानामुळे मंदिराचे उत्पन्नही वाढलेलं असायचं. या काळात वर्षभराचा जवळपास दीड कोटी रुपयापर्यंत वीज बिलाचा खर्च असायचा. कर्मचार्यांच्या पगारासाठी जवळपास चार कोटी 20 लाख रुपये लागतात. सोबत इतरही खर्च सुरूच आहे.
कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांकडून येणारं दान कमी झाले आहे. मात्र श्री विठ्ठल मंदिर आणि इतर इमारतींमधील येणाऱ्या वीज बिलाचा आकडा कमी असला तरी उत्पन्नाच्या मानाने तो मोठा वाटतोय. यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सोबतच राज्यातील इतर देवस्थानांची काहीशी अशीच अवस्था आहे. त्यामुळे अशा मंदिरांना वीज बिलामध्ये शासन सवलत देणार का ? हे पाहावं लागेल.