लोकसभेत आज omiocron ओमीओक्रॉनवर चर्चा
X
संसदेचे हिवाळी आधिवेशन पहील्या दिवसापासून वादळी ठरले असून आज लोकसभेत ओमिओक्रॉन कोविड विषाणु प्रादुर्भावावर चर्चा होणार आहे. सरकार धरण सुरक्षा आणि 'द असिस्टेड रिप्रॉडक्टिव टेक्नोलॉजी (रेगुलेशन) बिल, 2020' सादर करण्याची शक्यता आहे.
१२ खासदारांच्या निलंबनावरुन आक्रमक असलेले विरोधक कामकाजात सहभागी होणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
लोकसभा नियम १९३ अन्वये ओमिओक्रॉन वेरिअंटवर लोकसभेत आज चर्चा आणि आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांचे उत्तर होईल. काल राज्यसभेत ही चर्चा प्रश्नोत्तराच्या तासात झाली होती. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी देशात एकही ओमिओक्रॉन बाधीत रुग्ण नसल्याचे सांगितले होते.
संसदेच्या पहील्याच दिवशी वादग्रस्त कृषी कायदे माघारी घेतल्यानंतर सभागृहात चर्चा झालेली नाही.कामकाज आणि गोंधळावरुन सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोप करत असून विरोधक पॅगेसीस आणि एमएसपीसह इतर मुद्द्यावर आग्रही आहे. राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहांचे कामकाज सकाळी ११ वा वाजता सुरु होईल.