Home > News Update > Loksabha Election 2024: पुण्याच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय म्हणाले अजित पवार? वाचा

Loksabha Election 2024: पुण्याच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय म्हणाले अजित पवार? वाचा

Loksabha Election 2024: पुण्याच्या बैठकीत जागावाटपाबाबत काय म्हणाले अजित पवार? वाचा
X

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून बैठका घेऊन निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली असल्याचं चित्र आहे. महायुतीमध्ये जागेच्या वाटपासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे जागावापटपासंदर्भात नक्की काय ठरणार? याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला सात जागा येणार असल्याचं वर्तवलं जात आहे.

पु्ण्यातील "बोट क्लब" येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात जागावाटपासंदर्भात मार्गदर्शनपर महत्वाची बैठक पार पडली. राज्यभरातले आमदार, खासदार आणि पक्षातील विविध पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. निवडणूकीपूर्वी अजित पवारांनी आमदार, खासदार आणि पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.

परभणी, बारामती, सातारा, नाशिक, शिरूर, धाराशिव आणि रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत या बैठकीदरम्यान महत्वपूर्ण चर्चा झाली. परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दोन दिवसात ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबात या बैठकीत चर्चा करण्यात आली असून बारामतीचा उमेदवार बदलणार नाही म्हणत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. त्याच शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्या उमेदवारीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, अशी देखील चर्चा करण्यात आली.

स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी आमदारांना आपापल्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असून, पाच ते सहा सदस्याची टीम प्रत्येक आमदारासोबत असणार आहे. ही टीम प्रचार नियोजन आणि महायुतीच्या उमेदवारांबरोबर समन्वय साधण्याचे काम करणार आहे. निवडणूक पाच टप्प्यात होणार असून, वेळेचा सदुपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत २८ मार्चला जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होईल, असंही यावेली सांगण्यात आलं आहे.

Updated : 26 March 2024 6:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top