Home > Election 2020 > ३४ ग्रामपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान

३४ ग्रामपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान

३४ ग्रामपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान
X

राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

हे ही वाचा...

ऊस लागवड़ीची एक डोळा पद्धत शेतकऱ्यांच्या फ़ायद्याची की तोट्याची?

पुराने उद्ध्वस्त झालेल्या शाळा कधी दुरुस्त होणार?

कांदा महागला, अर्थमंत्री म्हणतात मी जास्त कांदा खात नाही

त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2, आणि सातारा- 3. एकूण- 34.

Updated : 5 Dec 2019 9:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top