Home > Max Political > स्थायी समितीचे गठन, राहुल गांधींना मिळालं 'हे' पद

स्थायी समितीचे गठन, राहुल गांधींना मिळालं 'हे' पद

स्थायी समितीचे गठन, राहुल गांधींना मिळालं हे पद
X

लोकसभा सचिवालयाने संसदेच्या स्थायी समिती संबंधित माहिती शुक्रवारी रात्री जाहीर केली. सतराव्या लोकसभेमध्ये वित्त आणि विदेश मंत्रालया संबंधित कमिटीचे अध्यक्ष पद यावेळेस काँग्रेसला मिळणार नाही. सोळाव्या लोकसभेमध्ये या स्थायी समितीचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडेच सोपवले गेले होते. परंतु या वेळी दोन्ही स्थायी समितीचे अध्यक्षपद हे भाजपाकडे ठेवण्यात आले आहे.

गत लोकसभेमध्ये शशी थरूर हे विदेश मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीत तर वीरप्पा मोईली वित्त मंत्रालय संबंधित स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यावेळेस जयंत सिंन्हा वित्त मंत्रालय आणि पी. पी. चौधरी विदेश मंत्रालयाशी निगडीत स्थायी समितीमध्ये अध्यक्ष होणार आहेत. आयटी मंत्रालयाशी निगडित समितीमध्ये शशी थरूर यांना अध्यक्ष असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना संरक्षणाशी संबंधित स्थायी समितीमध्ये सदस्य बनवले आहे.

भोपाल मधून पहिल्यांदा निवडून आलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनाही रेल्वेशी संबंधित स्थायी समितीमध्ये सदस्यत्व दिले गेले आहे. आनंद शर्मा यांना गृह खात्याशी संबंधित स्टॅंडिंग कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

Updated : 14 Sept 2019 12:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top