लॉकडाऊनमध्ये लसीकरणाचे काय? केंद्राचे राज्यांना आदेश
X
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉक़डाऊन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. यामुळे कोरोनाच्या लसीकरणावरही परिणाम झाला आहे. पण आता केंद्र सरकारने यासंदर्भात सर्व राज्यांना पत्र पाठवून लॉकडाऊनचा परिणाम लसीकरणावर होऊ देऊ नये, अशी सूचना केली आहे.
लॉकडाऊन असले तरी लसीकरणासाठी नागरिकांना हॉस्पिटलपर्यंत येण्यास आडकाठी करु नका, असे केंद्राने सांगितले आहे. तसेच ज्या हॉस्पिटल्समध्ये लसीकरण होत आहे तिथे वेगळ्या भागात किंवा इमारतीमध्ये लसीकरण करण्यात यावे, ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत, त्या ठिकाणी किंवा जवळपास लसीकरण करु नये असे आवाहनही केंद्राने केले आहे. देशात रविवारी 2 लाख 61 हजार कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते, तर सुमारे दीड हजार लोकांचा मृत्यू झाला होता.